प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: येथून जवळच असलेल्या सुनसगाव बेलव्हाळ चौफुलीवर बायपास जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या ओमनी ने मोटरसायकल ला धडक दिल्याने या अपघातामध्ये पती जखमी झाले असून पत्नीचा मृत्यू झाला आहे.
या बाबत माहिती अशी की , दि.२८ मे रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास वराडसिम येथील रहिवासी आरती उमाकांत भारंबे ह्या आपले पती उमाकांत विठ्ठल भारंबे यांच्या सोबत खेडी जळगाव येथून पापड तयार करून ॲक्टिवा क्र.एम एच १९ डी आर ३२४१ ने सुनसगाव मार्गे बेलव्हाळ फाट्यावरून वराडसीम येथे जात असताना गोजोरे गावाकडून नशिराबाद कडे भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी क्रमांक एम एच ०४ ई डी ५६२ या वरील वाहन चालकाने समोरासमोर धडक दिल्याने या घटनेत पती पत्नी गंभीर जखमी झाले. जखमींना गावातील उपसरपंच एकनाथ सपकाळे , राहुल नारखेडे तसेच वेफर्स काढणारे मंदाबाई भैय्या कोळी यांनी ताबडतोब रिक्षाने दोघांना सामान्य रुग्णालय जळगाव येथे दाखल केले. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना गंभीर मार लागल्याने आरती उमाकांत भारंबे ( वय ४४ ) यांचे निधन झाले तर पती उमाकांत भारंबे जखमी झाले आहेत. ओमनी चालकाचे नाव गाव समजू शकले नसून ओमनी चालक मलकापूर येथून नंदुरबार कडे जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.या बाबत माहिती मिळताच सुनसगाव पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीसांना माहिती कळवली असता भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड , पोऊनि संजय कंखरे , पोहेकाॅ धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच दोन्ही अपघातग्रस्त वाहने तालुका पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले आहेत. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ धिरज मंडलिक करीत आहेत.
नशिराबाद – बोदवड रस्त्याचे रुंदीकरण झाले पासून या रस्त्यावर डंपर , ट्रक तसेच इतर वाहने भरधाव वेगाने जातात त्यामुळे या ठिकाणी सुनसगाव – बेलव्हाळ चौफुलीवर दोन्ही बाजूंनी गतीरोधक
तसेच या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेल्या मोरीला कठडे बसविण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.










