नशिराबाद स्वयंशोध फाउंडेशन तर्फे पंचक्रोशीतील ९० गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गुणगौरव समारंभ संपन्न !

0
5

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – नशिराबाद येथील स्वयंशोध फाउंडेशन तर्फे नुकताच इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात नशिराबाद पंचक्रोशीतील सुमारे ९० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हिजन अकॅडमीचे संचालक अनिल माला सर होते. तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा व निंभोरा गाव सेवा समितीच्या युवा संयोजिका कु. भाग्यश्री विवेक ठाकरे आणि ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या वृषाली महाजन उपस्थित होत्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नशिराबादसह परिसरातील **मन्यारखेडा, जळगाव खुर्द, सुनसगाव आणि कडगाव या गावांमधील इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकजभाऊ महाजन , नगरसेवक चेतनभाऊ बऱ्हाटे , शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, जळगाव मनसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदभाऊ रोटे ,मनोज नाले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंशोध फाउंडेशनचे सचिव धीरज सैतवाल यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजेंद्र पासपांडे सर यांनी केले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वयंशोध फाउंडेशनचे सचिव धीरज सैतवाल, सदस्य महेश सपकाळे, चेतन सपकाळे, सागर धोबी, विशाल सावळे, आदेश राजपूत आदींनी अतोनात परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली. या कौतुक सोहळ्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

 

Spread the love