प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव बेलव्हाळ एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती मात्र सुनसगाव व बेलव्हाळ येथील सरपंच यांच्या कडे ग्रामस्थांनी एसटी सुरू करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे बेलव्हाळ येथील सरपंच पती जितेंद्र खाचणे व सुनसगाव येथील सरपंच पती भोजराज कोळी यांनी भुसावळ एसटी डेपो व्यवस्थापक राकेश शिवदे साहेब यांना निवेदन दिले होते.त्याच प्रमाणे या बाबत ना.संजयभाऊ सावकारे यांच्या कडे एसटी सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत एसटी डेपो व्यवस्थापक राकेश शिवदे साहेब यांनी भुसावळ बेलव्हाळ एसटी सेवा सुरू करुन ग्रामीण व गरजू गरीब जनतेसाठी सेवा दिली आहे. या अगोदर भुसावळ वराडसीम एसटी सेवा सुरू करण्यात आली होती आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विलास पाटील तसेच गोजोरे येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांनी प्रयत्न केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बेलव्हाळ एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. ना.संजयभाऊ सावकारे यांच्याशी पत्रकार जितेंद्र काटे यांनी संपर्क साधून एसटी सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
आज रोजी भुसावळ येथून सकाळी ९ वाजता तर दुपारी ३ वाजता अशी दोन वेळा एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील नागरिक एसटी सेवा सुरू झाल्याने फायदा घेतांना दिसत आहेत.












