सुदर्शन पेपर मीलच्या परप्रांतीय कामगाराचा अकस्मात मृत्यू ?

0
2

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे – सुनसगाव रस्त्यावरील सुदर्शन पेपर मील येथील कामगाराचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन पेपर मील गट नंबर ३०८ / १ येथे कामासाठी परराज्यातील कंत्राटी कामगार आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. याच मील मध्ये राजूभय्या ( वय ४४ ) रा.बांदा उत्तरप्रदेश हा कामगार आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. दि.३ जून च्या रात्री ते ४ जून च्या पहाटे राजू भय्या ( पुर्ण नाव माहित नाही ) हा घराच्या बाहेर पडलेल्या वाळू वर चटई टाकून झोपलेला होता. सकाळी उठला नाही म्हणून पाहिले असता नेमके काय झाले आणि राजू भय्या उठत नसल्याने तेथील कामगारांनी रिक्षा चालकाला बोलावून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला मात्र सदर कामगार मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून फाॅरेन्सिक लॅब टीम ने घटनास्थळी पाहणी केली. मृतदेहाचे ट्रामा सेंटर भुसावळ येथे शवविच्छेदन करण्यात आले आणि तेथून मृतदेह शववाहिकेने मयताचे गावी उत्तर प्रदेश येथे पाठविण्यात आला आहे. या बाबत तालुका पोलीसात फिर्याद दाखल करण्यात आली असून अमृक्र.२३ / २०२६ बीएनएस १९४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड , पो.ऊ.नि. संजय कंखरे , पोहेकाॅ धिरज मंडलिक, पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.पुढील तपास पोनि महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ धिरज मंडलिक करीत आहेत. या घटने बाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असले तरी शवविच्छेदन अहवालात सत्य समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Spread the love