प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – प्रगती शिक्षण मंडळ नशिराबादची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेमध्ये संस्थेच्या गतवर्षातील शैक्षणिक, प्रशासकीय व विकासात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच संस्थेच्या भावी वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यावेळी संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. त्यानुसार श्री वंदन युवराज वाणी यांची अध्यक्षपदी, श्री वसंत रामकृष्ण चौधरी यांची उपाध्यक्षपदी, श्री गोवर्धन नारायण पाटील यांची सचिवपदी तसेच सौ. ललिता युवराज वाणी यांची शिक्षण तज्ज्ञ म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
याशिवाय श्री सुधीर दिगंबर मोहरीर, श्री सदाशिव रोटे, श्री श्रीकांत लीलाधर चौधरी, श्री अनंता मंगलदास सदाफळे, श्री डॉ. विजय वाणी, श्री नेव्हील चौधरी तसेच डॉ. सौ. विरल वाणी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. युवराज राजाराम वाणी होते. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला अधिक बळकटी देत गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याच्या माध्यमातून प्रगती शिक्षण मंडळाची वाटचाल अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
सभेचा समारोप सर्व उपस्थित सदस्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून उत्साहपूर्ण वातावरणात झाला.












