कुऱ्हा पानाचे – जामनेर दरम्यान बस मधून दागिन्यांची चोरी !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – एसटी बस मधून प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्यांनी शेतकरी इसमाच्या चोर खिशातून दागिने चोरल्याची घटना घडली.

या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी कांतीलाल मोतीलाल चोपडा व्यवसाय शेती रा.शेंगोळा ता जामनेर यांनी फिर्याद की दि.३ जुलै रोजी लोहारा ते भुसावळ या एसटी बस मधून प्रवास करीत असताना जामनेर – कुऱ्हा पानाचे गावा दरम्यान सकाळी ११:२० ते ११:४५ वाजे दरम्यान फिर्यादीच्या पॅन्टीच्या चोर खिशात दागिने असलेले पाऊच ठेवले होते त्यात रुपये ३,६०,००० -/ किंमतीचे ९ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरांनी चोरल्याची फिर्याद दाखल केली आहे.यात (१ ) ३ तोळ्याची सोन्याची पोत किंमत १,२०,०००-/ रुपये , ( २ ) १.५ तोळ्याची सोन्याची चैन किंमत ६०,०००-/ रुपये ( ३ ) २.५ तोळ्याचे सोन्याचे ब्रासलेट ( ४ ) २ तोळ्याच्या ४ सोन्याच्या अंगठ्या किंमत ८०,०००-/ रुपये असा एकूण ३,६०,०००-/ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुरनं १३० / २०२६ बीएनएस कलम ३०५ ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि संजय कंखरे तपास करीत आहेत.

Spread the love