गोजोरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण !

0
7

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम गोजोरे गावात राबविण्यात यशस्वी होतात या वर्षी सुध्दा ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

गोजोरे गाव सध्या आदर्श गावाकडे जाताना दिसत आहे या गावात आता पर्यंत अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात आले त्यात युवकांसाठी विशेष गोष्टी करण्यात आल्या सुरवातीला अभ्यासिका, मैदान,खेळ, महिलांना मार्गदर्शन युवतींना वेगळी अभ्यासिका असे अनेक उपक्रम राबविले आता जेष्ठ नागरिक सुध्दा मागे न ठेवता ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.विशेष म्हणजे वृक्षारोपण करण्यात आले ते झाड जवळपास ७ ते ८ फूट उंच आहे त्यामुळे आणलेली हजारो रुपये किंमतीची ही सर्व झाडे जगवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक लक्ष्मण कोळी यांनी सांगितले. गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच जेष्ठ नागरिक यांनी सुध्दा वृक्षारोपण करताना मोठा उत्साह दाखवला कदाचित पाऊस पडताच वृक्षारोपण करणारी भुसावळ तालुक्यातील गोजोरे ग्रामपंचायत पहिली असावी असे बोलले जात आहे. आता गावातील जेष्ठ व वयोवृद्ध महिलांच्या हस्ते येत्या काही दिवसांत पुन्हा वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांनी सुध्दा वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे तसेच शेतकरी आपापल्या शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करणार असल्याचे सांगितले जात असून वृक्षारोपण प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love