सुनसगाव येथील श्री खंडेराव महाराज मंदिरात चिंचोरे परिवाराकडून कासव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

0
3

प्रतिनिधी : जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री खंडेराव महाराज मंदिरात चिंचोरे परिवाराच्या वतीने कासव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने करण्यात आली. मंदिरातील ही उणीव भरून काढल्याबद्दल भाविकांकडून चिंचोरे परिवाराचे कौतुक होत आहे.

हिंदू मंदिरांच्या परंपरेनुसार अनेक ठिकाणी मुख्य देवतेच्या मूर्तीसमोर कासवाची मूर्ती स्थापित केलेली असते. मात्र, सुनसगाव येथील श्री खंडेराव महाराज मंदिरात अशी मूर्ती नसल्याची बाब श्री खंडेराव महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या चिंचोरे परिवाराच्या निदर्शनास आली.

ही बाब लक्षात घेत किशोर अशोक चिंचोरे (व्यवसाय – रिक्षाचालक) यांनी स्वतःच्या खर्चातून सुंदर कासव मूर्तीची निर्मिती करून तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा मंदिरात केली. या उपक्रमामुळे मंदिराच्या धार्मिक सौंदर्यात भर पडली असून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

चिंचोरे परिवाराने कोणतीही प्रसिद्धी न करता श्रद्धेने केलेल्या या सेवाभावी कार्याचे ग्रामस्थ आणि भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात येत असून, अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांतून समाजात श्रद्धा, सेवा आणि संस्कारांची जपणूक होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Spread the love