विचखेडा-घाडवेल नाल्यावरील फरशी पुल तुटल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल… लोकसेवकांना लक्ष देण्याची मागणी…

0
36

विचखेडा ता. चोपडा : विचखेडा ते घाडवेल दरम्यान नाल्यावरील फरची पूल तुटल्याने विद्यार्थ्यांसमवेत नागरिकांची ससेहोलपट होत आहे . आताच शाळा सुरू झाली असून नाला तुटल्याने एस टी बस येऊ शकतं नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तरी वरिष्ठ पातळीवरून या फरशी पुलाचे काम ताबडतोब करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा अशीही नागरिकांतून होत आहे.

विचखेडा ते घाडवेल दरम्यान नाल्या वरील फरची पूल तुटल्या मुळे एस टी बस बंद झाल्यामुळे चहार्डी चोपडा येथे जाणारे विद्यार्थी वृध्द प्रवासी आजारी पेसेन्ट यांना दोन किलो मिटर पाई जावे लागते तसेच मोटर सायकल वाहन धारकांना कसरत करुन नाला पास करावा लागतो या मार्गाने अनवर्दे बुधगाव मार्गे अमळनेर जवळ असल्याने वाहनांची वर्दळ सुरू असते घाडवेल विचखेडा नाल्यावरील फरशी पुलाची दुरुस्ती करून व व अनवर्द खु ते घाडवेल दरम्यान असलेली काटेरी झुडपे तोडण्यात यावी याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी लक्ष द्यावे हि विचखेडा व परीसरातुन मागणी होत आहे.

Spread the love