प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – दि.७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विमानतळ प्राधिकरणाच्या कामांमुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर नशिराबाद नगरपरिषदेच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत, नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील, उपनगराध्यक्ष पंकज भाऊ महाजन व नगरसेवक तथा माजी जि.प.उपाध्यक्ष श्री. लालचंद भाऊ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे अधोरेखीत केल्या. विमानतळ प्राधिकरणाकडून बंद करण्यात येणारा रस्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असून, शेतीची अवजारे, बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांच्या दळणवळणासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा ठामपणे मांडत हा रस्ता कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला आदरणीय पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब, मा. जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब व उपस्थित अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हा रस्ता नियमितपणे सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
तसेच, पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील साहेब यांच्या विशेष पुढाकारातून साकार होत असलेला नशिराबाद-चिंचोली-उमाळा या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
नशिराबाद शहराच्या विकासासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल आदरणीय पालकमंत्री महोदयांचा नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीला आदरणीय पालकमंत्री मा.ना.श्री. गुलाबराव पाटील साहेब, मा.आमदार चंद्रकांत दादा सोनवणे, मा.जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे साहेब, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. योगेश नारायण पाटील, उपनगराध्यक्ष श्री. पंकज भाऊ महाजन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक श्री. लालचंद भाऊ पाटील, सभापती विकास भाऊ पाटील, कीर्तिकांत भाऊ चौबे, चेतन भाऊ बऱ्हाटे, मनोज भाऊ पाटील,नगरसेविका शैला ताई व्यवहारे, नगरसेवक अस्लम सर, इक्बाल शेख, सलीम भाऊ शहा, प्रदीप बोढरे, संदीप भाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास भाऊ धनगर,फिरदोस भाऊ तसेच विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, सा.बा. विभाग चे अधिकारी तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी आणी शेतकरी उपस्थित होते.












