प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड साहेब यांची नुकतीच भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे बदली झाली. एरंडोल येथून बदलून आलेले पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड साहेब यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला.आणि आता दि.१० ऑगस्ट रोजी जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रोबेशनरी पोलीस उपविभागीय अधिकारी असलेले प्रशांत दरेकर साहेबांची तीन महिन्यांसाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सुनसगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी शाल व पुस्तके देऊन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर साहेबांचा सत्कार केला. यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे रीडर एएसआय संजय तायडे , पोऊनि संजय कंखरे , पोहेकाॅ धिरज मंडलिक उपस्थित होते.












