प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री विठ्ठल मंदिराची त्रिवर्षीय सर्वसाधारण सभा स्वातंत्र्य दिनी पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी हभप चंद्रकांत भोळे होते. या सभेत नवीन कार्यकारिणी करण्यात आली असून सर्व तरुण भाविकांना संधी देण्यात आली आहे. अध्यक्ष – हर्षल संजय पाटील, उपाध्यक्ष – किशोर पंढरीनाथ नारखेडे , सचिव – रोहिदास दिनकर पाटील , खजिनदार – युवराज गोपाळ पाटील , संचालक – चंद्रकांत हेमराज भोळे , प्रविण प्रल्हाद पाटील , हेमराज लक्ष्मण पाटील , प्रसाद सतिश पाटील व पुजारी वासुदेव जगन्नाथ पाटील अशी कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. या बाबत चेअरमन हर्षल पाटील यांनी सांगितले आहे की, सदगुरू झेंडूजी महाराज श्री कुंडलेश्वर संस्थान बेळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात परंपरेने चालत आलेल्या सर्व कार्यक्रमाचे व सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.












