प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – सुनसगाव येथील श्री अंजनातील महादेव मंदिर येथे अभिषेक करण्यात यावा आणि कावड यात्रा काढण्याचा संकल्प शामराव मालचे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच पुर्ण करण्यात आला.यावेळी जय भोले गृप व गावातील शिवभक्तांनी वाजतगाजत तापी वाघुर नदी चे संगम असलेल्या शेळगाव धरण येथून कावड यात्रा काढली.यावेळी अजय राणे यांनी श्री स्वामी समर्थ डि जे व रेवा कंकरे यांनी पाण्यासाठी टँकर व सतिश सुरेश पाटील यांनी साहित्य वाहतूकीसाठी ट्रॅक्टर सेवा मोफत दिली.शेळगाव , भादली, नशिराबाद मार्गाने येताना भाविकांनी ठिकठिकाणी चहा नाश्ता सेवा दिली. कावड यात्रेचे नेतृत्व जय भोले गृप व शामराव मालचे यांनी केले. कावड यात्रेत आबालवृद्ध तसेच महिला व बालगोपाल मंडळी उपस्थित होते.












