प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या सर्व घरांचा तसेच दुकानांचा लिलाव करण्यात यावा अशी मागणी उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी केली आहे. मागील वर्षी ग्रामपंचायत मालकीच्या दुकान व घरांचा दर अकरा महिन्यांत लिलाव करण्यात येईल असे ठरले असताना सुद्धा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य हे लिलाव काढत नसल्याने आता तरी ग्रामपंचायतीने दुकाने व घरांचा लिलाव करावा अशी मागणी उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी केली आहे.यावर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काय निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.












