0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – यंदा खरीप हंगामात पाऊस पडला नसल्याने व शासनाने दुष्काळ जाहीर केला असल्याने शेती शिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून भेट देऊन अहवाल शासनाकडे सादर करायचा असल्याने दि.२९ सप्टेंबर पासून पिकांचा पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे. भुसावळ तालुक्यातील बेलव्हाळ ,सुनसगाव , गोंभी येथे ग्राम महसूल अधिकारी सुनिता वळवी , ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा तायडे , सुनसगाव सरपंच काजल कोळी, पोलीस पाटील खुशाल पाटील , पोलीस पाटील निलेश आंबिकार बेलव्हाळ , वैशाली पाटील पोलीस पाटील गोंभी , कृषी सहायक काळे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करीत आहेत. सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Spread the love