नवसाला पावणारी सुनसगावची भवानी माता ! (विजयादशमीला होते भाविकांची गर्दी)

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे – सुनसगाव रस्त्यावर तळ्याच्या विहीर जवळ भव्यदिव्य असे नवसाला पावणारी भवानी माता मंदिर आहे.या मंदिराचा जीर्णोद्धार येथील ठाकूर (विसवे) परिवाराने केला असून विजया दशमीला भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात त्यामुळे श्री भवानी माता मंदिर या परिसरात प्रसिद्ध होऊ लागले आहे.

राज्य मार्ग क्रमांक १९० सुनसगाव – गोजोरे रस्त्यावर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर लांबूनच दिसते त्यामुळे भाविक दर्शनासाठी जातात.या ठिकाणी नवरात्रात प्रत्येक दिवस देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरातील भवानी मातेची मूर्ती अतिशय सुंदर व विलोभनिय आहे.त्यामुळे बाहेर गावातील ठाकूर परिवारातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात एवढेच काय तर परिसरातील भाविकांची श्रद्धा असल्याने पंचक्रोशीतील भाविक येत असतात.

या मंदिराच्या जिर्णोद्धारा बाबत येथील प्रकाश हायस्कूल चे सेवा निवृत्त कर्मचारी प्रल्हाद ठाकूर यांनी सांगितले की ही भवानी माता नवसाला पावणारी प्रसिद्ध देवी आहे.ठाकूर (विसवे) परिवाराचे कुलदैवत आहे त्यामुळे ठाकूर परिवारातील लोक या मंदिरात नवरात्र मध्ये नऊ दिवस मुक्कामाला राहतात व यात्रोत्सव साजरा करतात.

आधी या ठिकाणी मंदिर छोटेसे व पडझड झालेल्या अवस्थेत होते मात्र शेतात येणारे शेतकरी व मजूर या ठिकाणी येऊन पूजन करीत होते . सुनसगावातील चौधरी कुटुंबातील भाविक या ठिकाणी येत असत मात्र शेती शिवार राखण्यासाठी पिक संरक्षण सोसायटीचे रखवालदार दयाराम कामाजी शिंदे यांना या मंदिरा जवळ साक्षात्कार झाला आणि त्यांनी या ठिकाणी मंदिराला ओटा बांधण्यात यावा अशी इच्छा सोनू ठाकूर यांच्या कडे व्यक्त केली असता हे भवानी माता मंदीर ठाकूर परिवाराचे कुलदैवत असल्याचे समजल्याने तेव्हा पासून ठाकूर परिवारातील सदस्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करीत मंदिर नावारूपाला आणले असून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात व नवस मानतात व नवस फेडण्यासाठी येत असतात असे सांगितले.

मंदिराच्या आजूबाजूला परिसरात वनराई असल्याने हे निसर्गरम्य वातावरण आहे तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सध्या या मंदिरात प्रल्हाद ठाकूर , रामदास ठाकूर ,दिपक ठाकूर , विजय ठाकूर , अशोक ठाकूर , राजेंद्र ठाकूर , अनिल ठाकूर , राजू ठाकूर , संदीप तायडे हे सेवा देत असून नवरात्र मध्ये या भवानी मातेची यात्रा भरविण्यात यावी अशी इच्छा ठाकूर ( विसवे ) परिवाराने व्यक्त केली आहे.

Spread the love