सुनसगाव ग्रामसभेत तरुणाईने मांडले प्रश्न , ४० विषयांवर झाली चर्चा !

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा सभा सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती मात्र ग्रामपंचायत अधिकारी यांचा ग्रामसभेवर बहिष्कार असल्याने सभा तहकूब करण्यात आली होती.त्यानंतर नुकतेच विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष सरपंच सौ काजल कोळी तर सचिव गोंभी येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक देवरे सर होते.

या सभेत घरकुल यादी वाचून मंजूरी देणे , ९९ वर्षं करारा वरील जागेवर घरकुल बांधणे , घरकुलाचा लाभ दुसऱ्यांदा घेऊ नये तसेच पती पत्नी पैकी एकाला घरकुल द्यावे , सेवा संकल्प अभियान राबविण्यात यावे , पांदन रस्ता बाबत पाठपुरावा करणे , चंद्राबाई तुकाराम पाटील यांच्या मृत्यू दाखला मिळणे , आत्माराम सुपडू काटे यांना शौचालय रकमेचा लाभ मिळणे , बीपीएल यादीतील मयतांच्या वारसांना लाभ मिळणे , मागील सरपंच व ग्रामसेवक यांचे ऑनलाईन नाव दुरुस्ती करणे , महिला शेतकरी प्रमाणपत्र काढणे , रेशनकार्ड धारकांना न्याय मिळणे , नदी व पुरुष शौचालयाची साफसफाई करण्यात यावी , गावातील कचरा गोळा करण्यात येणे ,गोंभी गावासाठी दोन दिवस रेशनिंग वाटप करण्यात यावे ,वार्ड क्रमांक दोन व तीन मध्ये हातपंप , गटारी दुरुस्ती करणे , महिला बचत गटांना जमिन उपलब्ध करून देणे , आदिवासी भिल्ल समाजाला सभागृह व आदिवासी समाजाच्या नावावर शेती लावणे , अपंग कल्याण निधी वेळोवेळी मिळावा , के टी वेअर बंधाऱ्यातील गाळ काढणे , स्वच्छ भारत अभियानांतर्गत योजना राबवून गावाच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करणे , बाहेर गावाहून आलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख तपासणी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत , मुलींसाठी अभ्यासिका सुरू करण्यात यावी , जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात याव्यात , मनरेगा अंतर्गत कामे मिळावीत , १६ वा वित्त आयोग कृती आराखडा मंजूर करणे , गावात हायमस्ट लॅम्प लावणे , बेलव्हाळ चौफुली ते हायस्कूल पक्का रस्ता करणे , प्रत्येक वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांनी वार्ड निहाय सभा घेणे , गोंभी गावात कोळी समाजासाठी सभागृह बांधावे , ग्रामसेवक यांचा ग्रामसभे वरील बहिष्कार मागे घेतल्यावर विशेष ग्रामसभा घेणे , सफाई कामगार घेणे तसेच घरकुल जागा वाटप करण्यात आल्यावर शिल्लक जागा सभागृहासाठी देणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असून मागील सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करणे हा विषय तात्पुरता बाजूला ठेवून वरील सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी गावातील सर्व पदाधिकारी व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love