सरकारने शेतकऱ्यांचे छोटा शेतकरी ,मोठा शेतकरी असे गट पाडून त्यांची वीज तोडून कत्तल करण्याचे थांबवावे….अन्यथा लवकरच जिल्ह्यात मोठे आंदोलन….एस बी नाना पाटील.

0
36

हेमकांत गायकवाड

चोपडा : पूर्वीच्या काळात जसे फोडा व राज्य करा असे सरकारचे धोरण असायचे तसे आता महाराष्ट्र सरकार ने सध्या फोडा आणि वसुली करा या नीतीने साऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता फक्त मोठ्या किंवा जुन्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिल्याचे खेडोपाडी समजले.आधीच दुष्काळ, त्यात अतिवृष्टी व आता कुठेतरी शेतकरी नवीन हंगाम येईल या आशेवर असताना,महाराष्ट्र सरकार मात्र शेती पंपाचे वीज तोडत आहे,मदत मिळत नाही.शेतकरी आत्महत्या वाढल्यात तरी सरकारला कीव येत नाही हे दुर्दैव.

सरकार कोळसा नाही म्हणून महाग वीज घेत असल्याचे सांगत आहे.आधीच शेतकऱ्यांच्या घरातील वीज प्रचंड महाग मिळत आहे.त्यात देखील जो इज्जतदार तो नियमित वीजबिल भरतो त्याला तोडू का म्हणून धमकी व जे आकडे टाकून चोरत आहेत त्यांचे काय?चोरांना मुभा व सज्जनांना शिक्षा हे धोरण दिसते                          आमची सरकारला विनंती आहे थोडी तुमच्यातील माणुसकी जिवंत ठेवा व हे बंद करा.

या संदर्भात आंदोलनाची भूमिका सोमवारी साऱ्या शेतकरी संघटना व राजकीय पक्ष यांचेशी चर्चा करून ठरवण्यात येईल.

Spread the love