हेमकांत गायकवाड
चोपडा : दिनांक 23 ऑक्टोबर 2021 , रोजी आमदार रोहित पवार यांचा चोपडा दौरा झाला. महात्मा गांधी शिक्षण मंडळ महाविद्यालयात रोहित पवार यांचे आगमन झाले असता, त्यांचे चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष के. डी. चौधरी यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट संदीप पाटील, काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर स्मिताताई पाटील, काँग्रेस शहर उपाध्यक्ष एस.डी. पाटील, चोपडा सूतगिरणीचे संचालक भागवतराव पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण प सोनवणे, प्रदीप पाटील ,नंदकिशोर सांगोरे, चेतन बाविस्कर, शैलेश वाघ आदी मान्यवर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.