जळगाव : जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज एका अनोळखी महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे खांबा क्रमांक ४२५/१७-१९ दरम्यान दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातात मृत झालेल्या महिलेचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याची माहिती समोर आली असून, अद्याप तिची ओळख पटलेली नाही. या घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
सदर महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा तिच्या नातेवाईकांची ओळख असल्यास खालील संपर्क क्रमांकांवर अथवा जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : ९८३४१०९६३३ / ९७६५१५४५५५











