ग.स.मधील कर्मचार्यांना दिवाळीचा बोनस मिळावा.. जगन्नाथ बाविस्कर.

0
36

चोपडा(प्रतिनिधी) जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था लि.जळगांव(ग.स.सोसायटी)ची सध्या प्रशासकिय कार्यकाळात चांगली वाटचाल सुरू असुन जनरल मिटिंगमधील सभासदांच्या मागणीनुसार दिवाळीपुर्वी कर्जाच्या व्याजदरात २ टक्के कपात केल्यामुळे जिल्हाभरातील सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तसेच कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगावरिल फरकाचा प्रलंबित पहिला हप्ता दिल्याने कर्मचार्यांतर्फे संस्थेचे प्राधिक्रुत अधिकारी मंडळ प्रमुख विजयसिंह गवळी व त्यांचे सर्व सहकारी,अधिकारी यांचे आभार व्यक्त होत आहेत.यासाठी संस्थेचे माजी पदाधिकारी,नेतेमंडळी,सभासदमंडळी,मुख्य कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी हितकारणी संघटना यांनीही विशेष प्रयत्न केलेले आहेत.

संस्थेच्या इतिहासात प्रथमच जनरल सभा शांततेत व परिपुर्ण झाल्याचे सर्व श्रेय प्रशासकांना देण्यात येत आहे.पुर्वीच्या काळात संस्थेतर्फे कर्मचार्यांना वर्षातुन दोनदा ८.३३ टक्के (एक महिन्याचा पुर्ण पगार) इतका बोनस दिला जात होता.परंतु आता संस्था नफ्यात असतांना कर्मचार्यांना वर्षातुन एकदा तरी बोनस दिला पाहिजे.यासाठी वार्षिक अहवालात कर्मचारी बोनसची तरतुद करण्यात आलेली आहे.त्यानुसार ग.स.संस्थेच्या कर्मचार्यांना ८.३३ टक्के याप्रमाणे (एक महिन्याचा पुर्ण पगार) दिवाळी बोनस म्हणुन देण्यात यावा,अशी आग्रही मागणी ग.स.मधील सेवकांची सहकारी पतसंस्था (स्टाफ् सोसायटी) चे संचालक जगन्नाथ तुळशिराम बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

Spread the love