जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचं जागावाटप अपडेट ..

0
11

जळगाव – जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी काल (शनिवारी) शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी 11, शिवसेना 7, काँग्रेस 3 अशा जागा लढणार आहेत. महिला राखीवमधून एका जागेची काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मागणीवर चर्चेअंती निर्णय होणार असल्याची माहिती आहे.जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.  या बैठकीत शिवसेना तर्फे आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी तर्फे डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, काँग्रेस तर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

यावेळी जागा वाटपावर चर्चा करण्यात आली. चोपडा येथील जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आल्याने सध्यातरी जागावाटपाचा हा तिढा सुटला आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 11 जागा देण्यात आल्या आहेत, शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला 3 जागा देण्यात आल्या आहेत.

काँगेस पक्षाला तीन जागा देण्यात आल्या असल्या तरी आणखी एका जागेची काँग्रेसची मागणी आहे. महिला राखीवमधून त्यांनी धरणगाव येथील काँग्रेस नेते डी. जी. पाटील यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.अमळनेर येथील तिलोतमा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अडून आहे. त्यामुळे या जागेचा वाद कायम आहे. सध्या ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे.

Spread the love