अतिक्रमणाची तक्रार केल्याचा राग आल्याने सरपंचासह आठ ते दहा जनांनी केला, चौघांवर केला जीवघेणा हल्ला,

0
17

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

लोण खुर्द येथील सरपंचाची दहशत दंगल, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनीधी ) तालुक्यातील लोण खुर्दच्या सरपंचाने ग्रामपंचायतीच्याच जागेवर अतिक्रमण करून जमीन हाडपण्याचा घाट घातल्याने पदाचा दुरोपयोग केल्याने त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने त्यांचे चांगलेच जिव्हारी आले. म्हणून तक्रार करणाऱ्यास चौघांवर अकरा जणांनी जीवघेणा हल्ला करीत दंगल घडवून आणली. ही घटना १८ रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. यात लोखंडी सळई, दगड, लाठ्या काठ्यांचा वापर करीत मारहाण करीत गावात दहशत माजवली. यामुळे गावाची शांतता भंगून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील लोण खुर्द येथील सरपंच विकास अरुण पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करीत जमीन हडपण्याचा घाट घातला आहे. त्यांनी पदाचा दुरोपयोग करीत गावात हम करे सो कायदा अशा अर्विभावत असल्याने सरळमार्गी आणि कायद्याने समाधान गुलाबराव शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याचा राग येऊन १८ रोजी सकाळी सव्वा आठ वाजता विकास अरुण शिंदे, बापू हिलाल पाटील, साधनाबाई बाबुराव पाटील , महेंद्र अरविंद शिंदे, निलेश निंबा शिंदे, चुनिलाल चिंतामण पाटील, बापू हिलाल पाटील, आदित्य चुनीलाल पाटील, संदीप गुलाब पाटील, सुशील निंबा पाटील, ज्ञानेश्वर प्रकाश पाटील हे समाधान यांच्या घरासमोर लाठ्या काठ्या, सळई, दगड घेऊन दहशत माजवत आले. त्यानंतर समाधानच्या वडिलांना कारन नसताना शिवीगाळ करू लागले.

वृद्ध महिलेलाही मारहाण, दातही पाडून केले रक्तबंभाळ

घरात घुसून महेंद्र याने गुलाबराव पाटील यांचा दात पाडला व लोखंडी सळईने पाठीवर मारहाण केली. लगेच निलेश याने हातातील काठीने डोक्यावर मारून रक्तबंबाळ केले. विकास याने दगडाने मारहाण करून दुखापत केली. लगेच तिघांनी समाधानला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच समाधानच्या आजी विमलबाई आधार पाटील व मालुबाई हिरामण पाटील यांनाही हात पिरगळून मारहाण केली. समाधानच्या फिर्यादीवरून मारवड पोलिस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल भटू तोमर करीत आहेत.

Spread the love