यावल मार्गावर ममुराबाद एस टी बसवर दगडफेक. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल,

0
19

जळगाव संदेश न्युज नेटवर्क

जळगाव -आज तब्बल सोळा दिवसानंतर एस टी महामंडळाने काही बसेस सुरु केल्यावर त्यापैकी चोपड्याला जाणाऱ्या बसवर ममुराबाद जवळच्या मातोश्री हाटेल जवळ काहि अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सामान्य जनतेतही राज्य सरकारच्या एस टी कर्मचाऱ्यांविषयीच्या उदासीनतेच्या बाबत रोष व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रतीक्षा यादीतील ३८ चालक व वाहकांना कामावर बोलावून आजपासून जळगाव आगारातून बसेस काही मार्गांवर सोडण्यात आल्या . यापैकी यावल मार्गावर एक बस जळगाव आगारातून दुपारी सोडण्यात आली ही बस यावल कडे जात असताना ममुराबाद जवळच्या मातोश्री हाटेल जवळ काही अज्ञात व्यक्तींनी समोरुण येत असलेल्या एम एच२० बी एल ३३६१ बसवर दगडफेक केली आणि बसच्या काचा सुद्धा फोडल्या. बसमध्ये फक्त तीन प्रवासी होते.या बसवर आजच रुजू करून घेतलेले चालक एम व्हि महाजन तसेच वाहक एम के पाटील. यांना नेमलेले होते.चालकाने वेळीच काळजी घेतल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच डेपो मॅनेजर श्री निलेश पाटील. तसेच बस स्थानक प्रमुख मनोज तिवारी. हे घटनास्थळी पोहचुन घटनेची चौकशी करण्यात आली सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार, PSI कल्याण नाना कासार, बिट आमलदार साहेबराव पाटील, विश्वनाथ गायकवाड, माणिक सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक महाले, यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घटनेबाबत चौकशी केली. व बस डेपोमध्ये पाठवण्यात आली.यावेळी ममुराबाद ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, धनराज पाटील, निंबा पाटील, यांनी सहकार्य केले.

बसवर दगळफेक करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरुद्ध उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Spread the love