जळगावात गेंदालाल मिल येथे 30 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

0
13

जळगाव : 30 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील गेंदालाल मिल परीसरात गुरुवार, 25 रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. विजय माणिक महाजन (30) असे मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा आक्रोश

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परीसरातील रहिवासी व खाजगी कंपनीत नोकरीस असलेल्या विजय महाजन या तरुणाने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणावरून केली ? हे अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही. गुरुवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास या तरुणाने गळफास घेतला. ही घटना शेजार्‍यांंच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर तत्काळ कुटुंबियांनी परीसरातील नागरिकांच्या मदतीने विजयला खाली उतरवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून विजयला मयत घोषित केले. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ असा परीवार आहे.

Spread the love