सावधान! कोरोनाचा नवा व्हेरिएंट इस्रायलमध्ये

0
8

जेरूसलेम : कोरोनाचा नवा व्हेरिएंट जगभरात हातपाय पसरू लागला आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोटस्वानानंतर आता कोरोनाचा हा व्हेरिएंट इस्राईलपर्यंत पोहोचला आहे. इस्राईलच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाला कारणीभूत ठरलेला अतिधोकादायक कोरोना व्हेरिएंट इस्राईलमध्ये सापडला असून इस्राईलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण मलावीमधून परतला होता. मलावीशिवाय इतर देशांमधून परतलेल्या अन्य २ प्रवाशांमध्ये देखील या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

लसीकरणानंतरही कोरोनाची लागण

इस्राईलमध्ये संसर्ग झालेल्या तिन्ही रुग्णांचे लसीकरण झाले होते. यानंतरही नव्या कोरोना व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याचे समजते. या व्हेरिएंटने इस्राईलसह जगभरातील आरोग्य यंत्रणेची काळजी वाढवली आहे. दरम्यान, याआधी जगभरात धोकादायक समजल्या गेलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अनेक पटीने हा व्हेरिएंट घातक असल्याचे समोर येत आहे.

Spread the love