चाळीसगाव : शहरातील मालेगाव रोडवरीजवळ बजाज गॅस एजन्सीचे शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील 31 हजार 800 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शटरचे कुलूप तोडून रोकड लंपास
शहरातील मालेगाव रोडवर बजाज गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. 30 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 ते 1 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास एजन्सीचे बंद कार्यालय अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील कॅबिनमधील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 31 हजार 800 रुपये चोरून नेले.या प्रकरणी बजाज एजन्सीचे व्यवस्थापक अशोक किसनचंद छाबडीया (56, रा.पवार वाडी, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक राहुल सोनवणे करीत आहे.