जळगाव -तालुका पोलीस स्टेशन हद्दीत बिबा नगर जळगाव मध्ये इसम नामे अनिल रघुनाथ भोई वय 31 वर्षं रा.बिबा नगर,नारायण नगर जळगाव याने त्याचे घरी एक गावठी बनावटीचा कट्टा व लोखंडी तलवार बाळगून आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्या वरून सहा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील,पो नाईक विश्वनाथ गायकवाड, महेश महाले,रवींद्र मोतीराया,तुषार जोशी,संजय भालेराव,दिनेश पाटील, अशोक महाले तसेच म पो हवा शोभा न्याहळदे अशांनी
याबाबत सविस्तर वृत्त असे कि दि.3/12/21 रोजी अनिल भोई याची घर झडती घेतली असता एक गावठी कट्टा,4 जिवंत काडतुस व एक लोखंडी तलवार असे मिळून आले असून 18.30 वा छापा टाकून इसम अनिल रघुनाथ भोई यास ताब्यात घेऊन गावठी कट्टा,4 जिवंत कडतुस व तलवार असे शस्रे बेकायदेशीररित्या गुन्हा करण्याच्या उद्देशाने बालगताना मिळून आल्याने सदर हत्यार जप्त करून ताब्यात घेतले आहे
आरोपी अनिल रघुनाथ भोई वय 31 रा बिबा नगर जळगाव याने मा. जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केले असून नमूद आरोपी याने आर्म ऍक्ट 3/25,,4/25 तसेच महा पोअधि नियम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा केला असुन नमुद आरोपी याचे विरुद्ध पोलीस नाईक विश्वनाथ बाबूलाल गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.