धरणगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील बोरगाव बु. येथील शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे सिद्ध झाल्याने ग्रामपंचायत सदस्या मीराबाई पवार यांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे.
अशोक मराठे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती ती मंजूर करत दिलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली.
२ डिसेंबररोजी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या वतीने काढलेल्या निकालाच्या सूचनापत्रात धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु. येथील ग्रामपंचायत सदस्या मिराबाई शिवाजी पवार यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आदेशाच्या दिनांकापासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४-ज-३ नुसार ग्रामपंचायत सदस्या म्हणून पुढे राहण्यास अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.