यावल फैजपुर मार्गावर चितोडा यावल रस्त्यावर दुचाकीच्या चाकात स्कार्प अडकुन पडल्याने महीलेचा दुदैवी मृत्यु

0
18

प्रवीण मेघे

यावल -येथील चितोडा ते यावल दरम्यान रस्त्यावर स्कार्प मोटरसायकलच्या टायरात अडकुन फ्डल्याने झाले अपघातात एका महीलेचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की आज दिनांक २ जुलै रोजी सायंकाळी ३ , ४५मिनीटाने यावल फैजपुर मार्गावरील रस्त्यावर यावल येथील व्यासनगर येथील पेट्रॉलपंपाच्या मागे राहणार अनिल लिलाधर सोनवणे हे डोंगर कठोरा तालुका यावल येथील पोस्ट ऑफीस मध्ये कर्मचारी असुन ते नियमित त्यांची पत्नी कल्पना अनिल सोनवणे वय३९ वर्ष डोंगर कठोरा येथे उपप्राथमिक केंद्र आरोग्य मदतनिस म्हणुन कार्यरत या आपले पती अनिल सोनवणे यांच्या सोबत मोटरसायकल क्रमांक एमएच १९ बिएच५८६५या दुचाकी वाहनाने यावल येथे येत असतांना चितोडा यावल दरम्यान ढाके वकील यांच्या शेता जवळ त्यांच्या तोंडाला बांधलेला स्कार्प ( रूमाल ) हा मोटरसायकलच्या मागच्या चाकात अडकुन त्या मोटरसायकलवरून रोडावर खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी .बारेला यांनी त्यांना मृत घोषीत केले. मयत पावलेल्या कल्पना सोनवणे आणी त्यांचे पती अनिल सोनवणे हे दोघ ही डोंगर कठोरा येथे मागील दहा वर्षापासुन शासकीय नौकरीस असुन ते नियमित डोंगर कठोरा ते यावल आपल्या दुचाकी वाहनाने ये जा करीत असे . अपघाताचे वृत्त कळताच माजी जिल्हा परिषद हर्षल पाटील , सामाजीक कार्यकर्ते सलीम तडवी सर , भाजपा उदय बाऊस्कर, पिन्टु राणे, डोंगर कठोरा सरपंच नवाज तडवी, उपसपंचन धनराज पाटील , नितीन भिरूड आदी रुग्णालयात मदतीसाठी धाव घेतली .

Spread the love