जळगाव -दिनांक 8.12.2021 रोजी सायंकाळी 7.00 वाजेचे सुमारास दादावाडी परीसरात 2 ईसम मोटार सायकलीने फिरत असून ते मोटार सायकल चोरी करणारे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पो ना दिनेश पाटिल, पो ना विश्वनाथ गायकवाड पो को भूषण सपकाळे, पो को प्रशांत ठाकूर यांचेसह सदर परीसरात जावून बातमीप्रमाणे वर्णनाचा SBI atm जवळ त्यांचा शोध घेतला असता दोघे ईसम त्यांचेजवळील पल्सर मोटार सायकलीने संशयीत रित्या फिरत असतांना मिळुन आल्याने त्यांचे जवळ जावून त्यांना हटकले असता त्यातील मोटार सायकल चालवित असलेल्या इसमाने अतिशय जोरात त्याचे ताब्यातील मोटार सायकल चालवित नेली. त्यावेळी मागे बसलेल्या इसमावर सोबतचे पोलीस स्टाफने झडप घालून त्याला जागीच पकडले असता त्याने त्याचे नाव सोहेल युसूफ अली वय 19 रा. रजा टॉवर, जाम मोहल्ला ईराणी गल्ली भूसावळ असे सांगितले व मोटार सायकने पळुन गेलेल्या ईसमाचे नाव सुलतान जावेद जाफरी उर्फ लल्ला रा. रजा टॉवर. जाम मोहल्ला ईराणी गल्ली भूसावळ असे सांगितले असून त्याचे ताब्यातील तो पळवून घेवून गेलेली पल्सर मोटार सायकल हि चोरीची असल्याचे सांगितले. त्यावरून सदर इसमास ताब्यात घेतले असून त्यास पो स्टे ला आणून अधिक विचारपुस केली असता त्याने जळगाव तालुका पो स्टे हद्यीत दिनांक 07.09.2021 रोजी रात्री एकविरा हॉटेल जवळून एक होंडा लिओ कंपनीची मोटार सायकल चोरी केली असल्याचे सांगितले आहे. सदरची मोटार सायकल चोरी बाबत जळगाव तालुका पो. स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आहे.
सदर ताब्यात घेतलेल्या इसमास सखोल विचारपुस केली असता त्याने पाचोरा येथून एक व्हिवो व एक ओपो कंपनीचे मोबाईल फोन चोरी केली असल्याचे सांगितले आहे. तसेच जामनेर येथून एक व्हिवो व एक ओपो सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन चोरी केली असल्याचे सांगितले आहे. तसेच वरणगाव येथून एक व्हिवो व एक ओपो सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन चोरी केल्याचे सांगत आहे. तरी सदर ताब्यात असलेला इसम सोहेल युसूफ अली वय 19 रा. रजा टॉवर, जाम मोहल्ला ईराणी गल्ली भूसावळ यास वरील गुन्हयात अटक करून वरीष्ठांचे मार्गदर्शनानूसार पुढिल रितसर कारवाई करीत आहोत.