भोलाणे शिवारात तालुका पोलिसांचा अवैध दारू भट्टी वर छापा

0
37

जळगाव – तालुक्यातील भोलाणे येथे अवैध रित्या गावठी हातभट्टी वर तालुका पोलिसांनी छापा टाकत दारू तयार करण्यासाठी वापरणाऱ्या रसायन व इतर साहित्य तालुका पोलिसांनी नष्ट केले आहे.

याबाबत सविस्तर असे की रविवार दि 12 रोजी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून भोलाने शिवारात तापी नदीच्या काठी योगेश नारायण कोळी बँरलमध्ये हातभट्टी साठी लागणारे कच्चे रसायणाचा साठा जवळ बाळगून गावठी दारू तयार करीत आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार.सा फौ माणिक सपकाळे. पो हे कॉ साहेबराव पाटील. विलास शिंदे. ज्ञानेश्वर कोळी. यांनी तापी नदीच्या काठी जाऊन छापा मारून जळती भट्टीवर नवसागर मिश्रित कच्चे व गरम असे 400 लिटर रसायन आणि गावठी हात भट्टीची 60 लिटर तयार दारू असे ड्रम सह 23600 रु मुद्देमाल मिळून आल्याने प्रोव्ही कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love