भूमी फाउंडेशन तर्फे एक सेल्फी…देशासाठी अभियान अंतर्गत सेल्फी पॉईंट !

0
15

दिपक नेवे

टोकियो येथे जागतिक पातळीवरील ऑलिम्पिक स्पर्धा सध्या सुरू आहे. त्यामध्ये भारताचे जवळपास 127 खेडाळू (Athlets) सहभागी झाले आहेत. केंद्र सरकार, केंद्रीय क्रिडा व युवा मंत्रालय, राज्य सरकार सर्वांनीच आपल्या देशाच्या वतीने सहभागी खेडाळूचे मनोबल वाढावे ,त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी जास्तीत जास्त मेडल्स जिंकून आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर उंच करावे , तसेच देशातील युवकांना व सर्व नागरिकांच्या मनांत देशप्रेम व राष्ट्रभावना जागृत व्हावी , म्हणून #Cheer4India अभियान राबवीन्याचे आवाहन केले आहे .त्या अंतर्गत भूमी फाउंडेशनच्या वतीने साकळी गावातील मुख्य चौकात सेल्फी पॉईंट फॉर #Cheer4India उभारला आहे. त्याचे उद्घाटन जळगाव जि.प.चे शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील तसेच साकळी गावाचे सुपुत्र सेवानिवृत्त सैनिक प्रविण पारीस्कर तसेच बॉक्सिंग राष्द्रीय चॅम्पियनपटू, कु.दिशा विजय पाटील (किनगाव) जळगाव जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य तेजस धनंजय पाटील (शिरसाड ) या मान्यवरांच्या हस्ते आज दि.१ ऑगस्ट रोजी साकळीच्या मुख्य चौकात पार पडला. प्रास्तविक व सूत्र संचलन व आभार प्रदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी केले. टोकियोला गेलेल्या सर्व भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक सेल्फी क्लीक करून

एक सेल्फी.. देशसेवेसाठी ! या अभियानात भाग घ्या. असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप तायडे, महेंद्र पाटील, अजय पाटील, दीपक खेवलकर,हेमंत वाघळे, मुकेश मराठे,ज्ञानेश्वर सोनार,दर्पण खेवलकर यांनी परिश्रम घेतले .

Spread the love