सेतू सेवा केंद्र चालकाकडून दर फलक दर्शनी भागावर नसल्याने ग्राहकांची सर्रास लूट?     

0
35

धरणगाव :- तालुक्यातील झुरखेडा गावात सी एस सी सेंटर मार्फत ई-श्रम व आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड चे वाटप चढ्या दराने केले जात होते त्या अनुषंगाने गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेशआप्पा पवार पाटील यांनी मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीला अनुसरूण शुभांगी भारदे  नोडेल अधिकारी यांनी अभिनंदन पाटील जिल्हा व्यवस्थापन सी एस सी जळगाव यांना पत्र लिहून चालक केंद्रांवरील नियमांची आठवण करून कोणत्याही केंद्रावर नागरिकांची चढ्या दराने लूट होत असल्यास त्यांचे परवाने आपल्या स्तरावरून रद्द करण्यात यावे. असे आदेशच दिले आहेत त्याचप्रमाणे आपले सरकार ई -सेवा केंद्राची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय गल्लीबोळातही अनेक केंद्र दिसून येतात. अशा काही केंद्रात मनमानी फी वसूल केले जाते. तर काही केंद्र शासनाने ठरवून दिल्या नियमानुसार फी घेतली जाते. शासनाद्वारे संचलित ई- सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र, आधार केंद्र ,आदी सुविधा केंद्रांमध्ये शुल्लक फलक नसल्याने केंद्र चालकाकडून ग्राहकांची सर्रास लूट केल्या जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केल्यानंतर सर्व केंद्रचालकांनी सेवा शुल्क फलक केंद्राच्या दर्शनी भागावर लावावे अन्यथा दोषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल व त्यांचा परवाना कायमचा रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जारी करण्यात आले आहेत. नागरिकांना आवश्यक दस्तावेज व प्रमाणपत्रासाठी इतरत्र भटकू नये त्यांना एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाने ई- सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, आधार केंद्र, सुविधा करून दिली या ठिकाणी आधार कार्ड ,जात प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, डोमासाईल, रेशन कार्ड, राजपत्र, ई- श्रम कार्ड, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड व इतर शासकीय योजना सह विविध सेवा उपलब्ध होतात. सोबतच नागरिकांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून शासनाने शुल्क सुद्धा निश्चित करून दिले आहेत. तसेच दर फलक केंद्राच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाद्वारे 11 जानेवारी 2018 मध्ये मार्गदर्शक सूचना बाबत जाहीर केलेल्या अधिसूचनेत मध्ये केंद्र संचालकांना संबंधी नियम व कार्यवाहीची माहिती दिली आहे. परंतु काही केंद्रसंचालकाद्वारे सेवा नुसार शुल्काचा फलक (रेट बोर्ड ) न लावल्यामुळे नागरिकांमध्ये शुल्का विषयी संभ्रम निर्माण होत आहे.आगाऊ शुल्क घेऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे. शासनाने सर्वच केंद्रासाठी सेवा नुसार एकसमान दर निश्चित केले असून दर फरक न लावल्यामुळे नागरिकांना शुल्काची माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांची फसगत होते. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालया कडून  शहरी व ग्रामीण भागामधील सर्व ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र (सी एस सी) सेतू केंद्र आधार केंद्र संचालकांना आपापल्या केंद्रामध्ये  व गावोगावी कार्ड वाटप करतांना दर फलक लावण्याबाबत आदेश दिले आहेत आणि त्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर केंद्रचालकांवर सी एस सी सेंटर चे जिल्हा व्यवस्थापक यांना केंद्राचा परवाना कायमचा स्वरूपी रद्द करण्यात यावा. असे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

Spread the love