दिपक नेवे
साकळी प्राथमिक आरोग्य केद्रां अंतर्गत थोरगव्हाण उपकेद्रातील आरोग्य सेविका सविता समाधान कोळी यांची बदली झाल्याने त्याच्या आशा सेविका व उपकेद्रातील कर्मचारी वर्गा मार्फत निरोप देण्यात आला.थोरगव्हाण आरोग्य उपकेद्रात गेल्या आठ वर्षा पासुन रुग्णाची चांगल्या प्रकारे सेवा करुन उकृष्ट काम केल्या बद्दल आशा सेविका मार्फत शाल नारळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आरोग्य सेवक मंकरद निकुंभ, संजय पारधी ,समाधान कोळी ,निर्जला सोनवणे, माया धिवर, रजंना कोळी ,कल्पना सोळंखे, बेबाबाई न्हावी उपस्थिती होते.