वड्रीच्या आदीवासी पाडयावर प्रहारच्या अॅड नंदीनी चौधरी यांची भेट
दिपक नेवे
यावल तालुक्यातील वड्री जवळच्या आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या एका आठ महिन्याच्या कुपोषित बालकाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज शनिवार ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान ..मृत्यू झाल्याचे उघडकीला आल्याने कुटूंबायाची सांत्वन भेट घेण्यासाठी प्रहारचे विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांची कन्या ऍडव्होकेट नंदिनी अनिल चौधरी यांनी थेट सातपुड़ा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी या वस्तीवर भेट देवुन दिली व कुपोषणामुळे बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याने आदीवासी वस्तीवर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन , मयत झालेल्या बाळाच्या कुटूंबित्यात मोठया प्रमाणावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगी अॅड नंदीनी चौधरी यांनी आदीवासी वस्तीवर जावुन त्यांना धीर देण्यासाठी ऍडव्होकेट नंदिनी चौधरी प्रयत्न करत आहे..
दरम्यान मयत कुपोषग्रस्त बालकाच्या कुटुंबास न्याय मिळावा याकरीता त्यांनी जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत तातडीने मदत व्हावी यासाठी प्रभारी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांची अॅड नंदिनी चौधरी यांनी भेट घेतली या भेटी दरम्यान यावल तालुक्यातील आदीवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांसह तालुक्यातील कुपोषणग्रस्तांच्या एकुण संख्याबाबत सखौल माहीती घेतली व आपल्या कार्यालयाच्या माध्यमातुन युद्धपातळीवर योग्यती पाऊले उचलुन कुपोषणग्रस्तांसाठी तात्काळ योग्य ती शासकीय पातळीवर मदत करावी अशा सुचना ही यावेळी महीला व बालविकास प्रकल्पच्या अधिकारी अर्चना आटोळे यांना दिल्यात यावेळी त्यांच्या सोबत प्रहार पक्षाचे राजु शेख , सागर चौधरी , राहुल कचरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते