यावल कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाला” संबंध आरोग्य प्रतिष्ठान” तर्फे तीन सुवर्णपदक

0
12

दिपक नेवे

यावल येथील म.वि.प्र .सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान कोविड-19 संदर्भात पाच हजार नागरिकांना जनजागृती केल्याबद्दल “संबंध आरोग्य प्रतिष्ठान”ने तीन सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. राज्यात व देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने, जनतेने आरोग्याची काळजी कशी द्यावी. या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.व्ही .पावरा , स्वयंसेवक हेमराज विश्वनाथ बारी व वेदांत श्रीकांत सराफ यांना हे सुवर्णपदक मिळाले. हा उपक्रम प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.

मिळालेले सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र संबंधितांना डॉ. संध्या सोनवणे यांनी प्रदान केले .या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, डॉ. सुधा खराटे, अनिल इंगळे, डी. सी. पाटील व मिलिंद बोरघडे उपस्थित होते .यश प्राप्त केल्याबद्दल संबंधीताचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Spread the love