लहान भावावर मोठ्या भावाचा चाकूने हल्ला : जळगावातील घटना

0
12

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरात कौटुंबिक वादातून लहान भावावरच मोठ्या भावाने चाकूने हल्ला केला. आरोपीविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवार, 8 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

कौटुंबिक वादातून चाकू हल्ला

शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरात सचिन सुरेश सपकाळे हे पत्नी रेणूदेवी सपकाळे यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी सचिन सपकाळे यांचा मोठा भाऊ विशाल सुरेश सपकाळे देखील कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 7 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास विशाल सपकाळे हा भाऊ सचिन सपकाळे यांच्या घरी आला व जुन्या कौटुंबिक वादातून शिविगाळ करू लागला. त्यानंतर सुरेशने हातातील चाकू सचिनच्या डोक्यावर मारला तसेच रेणूदेवी सपकाळे यांना डोक्याला मारहाण केली. दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवार, 8 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता तक्रार दिल्यानंतर संशयीत विशाल सुरेश सपकाळेविरोधात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार संजय धनगर करीत आहेत.

Spread the love