रावेर – तालुक्यातील निंभोरा बु येथे बऱ्याच दिवसापासुन बस स्थानक व आजुबाजुच्या परिसरामध्ये मोठेमोठे खड्डे पडल्याने वाहानांना व पायी चालणार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता . येथील सरपंच श्री सचिन महाले यांनी सार्वजानीक बांधकाम विभागा कडे मुरूम टाकण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे दिनांक ५ रोजी साबांवि ने दखल घेऊन निंभोरा बु बस स्थानक व बस स्थानक परिसरामधील खड्यांनमध्ये मुरूम टाकुन भर करण्यात आली . यावेळी सरपंच सचिन भाऊ महाले . ग्रा पं सदस्य मनोहर तायडे . सतिष पाटील . अकिल खाटीक . रविंद्र महाले . पवन चौधरी . सागर तायडे . आदी ग्रामस्थ उपस्थीत होते .
रिक्षा चालकांनी मानले आभार
बऱ्याच दिवसा पासून खड्यांन मुळे रिक्षा चालवायला त्रास होत असल्याने व खड्यांनमधुन गाडी चालवत असल्याने गाड्यांन मध्ये नेहमी बिघाड होत असायचा परंतु यासर्व बाबींचा विचार करूण सरपंच सचिन भाऊ यांनी वेळेवेळी सांबांवि कडे पाठपुरावा करून खड्यांनमध्ये मुरुमाची भर करूण दिली त्यामुळे येथील सर्व रिक्षा चालकांनी सरपंच सचिन भाऊ महाले यांचे आभार मानले .