प्रविण मेघे
यावल-: जळगाव राज्य उत्पादन शुल्कच्या भुसावळ विभागाने गुरुवारी मोहराळा फाट्याजवळ सापळा रचून ३ लाख १३ हजार रुपयांचे मद्यार्क जप्त केले, याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. यावल – चोपडा रस्त्यावर मद्यार्काची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भुसावळ विभागाला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक सी.एच .पाटील , जयराम जाखेरे , के.एन.बुवा , सत्यविजय ठेगडे , आनंद पाटील , मधुकर वाघ , एस. पाटील , विठ्ठल हटकर , यशोधर जोशी , भूषण वाणी , अजय गावंडे , विपुल राजपूत , मुकेश पाटील यांनी मोहराळा फाटा येथे सापळा रचला. सर्व वाहनांची तपासणी सुरू केली. या वेळी एमएच १८ एए ६०४८ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून सहा ड्रम भरुन मद्यार्क वाहून नेत असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता ड्रममध्ये मद्यार्क असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वाहनचालक योगश संजय पाटील ( रा . पाडळसा , ता . यावल ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कचा भुसावळ विभाग तपास करीत आहे.