मजरेहोळकरांचे रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन..

0
38

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क
चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील मजरेहोळ फाटा ते गावपर्यंतचा एक ते दीड किलोमीटर रस्ता अतिशय खराब झालेला असून वापरण्यायोग्य राहिलेला नाही.याबाबत पाठपुरावा सुरू होता.परंतु संबंधित विभागाचे याकडे अक्षम्यं दुर्लक्ष झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणूनच चोपडा धरणगाव मार्गावरील मजरेहोळ फाट्यावर सामा.कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर यांच्या नेतृत्वात दि.१७ फेब्रुवारी रोजी स.११ वा.तिव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

https://youtu.be/G5uAZ9aBrzY

रस्त्यावर गाडीबैल व ट्रॅक्टर आडवे लावण्यात आले होते.यावेळी पुरूषांसह महिलांचीही उपस्थिती लक्षणिय होती.जि.प.सदस्या सौ.निलिमा पाटील यांनी मोबाईल वरून आंदोलनकर्त्यांशी बोलतांना रस्ता दुरूस्तीचे आश्वासन दिले.तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार,पं.स.चे शाखा अभियंता यांनीही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.आमचा रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास लवकरच चोपडा तहसील कार्यालयासमोर ठिय्या व आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला.जि.प.सदस्या निलिमा पाटिल यांनी आश्वासन दिल्यामुळे कमी वेळेत आंदोलन थांबवुन दोन्ही बाजुकडील थांबलेली वाहतुक सुरळीत करण्यात आली.याप्रसंगी आंदोलनस्थळी सामा. कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर, सरपंच सौ.रमाबाई पाटिल.,उपसरपंच सौ.शारदा पाटिल.,ग्रा.पं.सदस्य सौ.रेखाबाई पाटिल,सौ.केशरबाई पाटिल,माजी सरपंच महेंद्र कोळी,माजी उपसरपंच विकास पाटिल यांचेसह रविंद्र पा.,रणछोड पा.,अशोक मराठे,प्रकाश मराठे,सुरेश बनसोडे,बाळु नाईक,मैनाबाई नाईक,उखा नाईक,अर्जुन शार्दुल,हिरालाल कोळी,नंदलाल पा.,सतिष पा.,चंपालाल पा.,जमनादास पा.,मुलचंद पा.,भगवान पा.,मुरलीधर पा.,सोपान पा.,ज्ञानेश्वर पा.,विश्वनाथ पा.,रमण पा.,भिका ठाकरे,तुळशिराम ठाकरे,रमेश पा.,सुनिल पा.,तुळशिराम पा.,संदिप पा.,विजय पा.,भिमराव कोळी,प्रसाद पा.,मनोज पा.,गोरख पाटिल यांची उपस्थिती होती.चोपडा शहर पो.स्टे.चे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Spread the love