खिरोदा प्र. (यावल) येथे वर्षानुवर्षापासून अतिक्रमित असलेल्या रहिवाशी जागा ग्रामपंचायत तर्फे ‘सर्वांसाठी घर योजना २०२१-२२ अंतर्गत नियमित करण्यात येऊन, सर्व लाभार्थ्यांना *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांचे हस्ते ७/१२ व ८ अ उतारे वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह प.स.रावेर सभापती सौ.कविताताई कोळी, जि.प.सदस्य सपकाळे ताई, भाजपा ओबीसी मोर्चा सचिव भरतभाऊ महाजन, जिल्हा सरपंच परिषद अध्यक्ष पुरोजित चौधरी, खिरोदा सरपंच कविताताई भारंबे, उपसरपंच जे.बी.भंगाळे, श्री.धनंजय चौधरी यांच्यासह खिरोदा ग्रामस्थ उपस्थित होते.