अडावद ता. चोपडा प्रतिनिधी: (महेश गायकवाड)
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहाने संपन्न झाली.
दि.१९ रोजी सकाळी ९ वाजता अडावद ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच भावनाताई पंढरीनाथ माळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण व पुजनविधी करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव महाजन , डिगंबर पाटील, विजय साळुंखे, जावेदखां पठाण, अलताफखां पठाण, सचिन महाजन, अनिल देशमुख, रियाजअली सैय्यद, वासुदेव महाजन, विकासो चेअरमन प्रभाकर महाजन, जितेंद्र परदेशी, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंके, लिपिक प्रेमराज पवार, तुषार मगरे , पुरुषोत्त महाजन, भिकन पाटील आदी उपस्थित होते.