ममुराबाद – येथे १४ वा वित्त आयोगाचे जवळपास तीन लाख रूपयाचे काम दलितांच्या स्मशानभुमी मध्ये न करता दुसऱ्याच जागी करून त्याचे पैसे १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधुन काढुन घेऊन एक प्रकारे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि तक्रारदार महेंद्र सोनवणे यांनी सदर विषयाबाबत दिनांक २७/०४/२०२१ रोजी सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत ममुराबाद यांना तक्रारी अर्ज केलेला असतांना सुध्दा सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी दलितांच्या स्मशानभुमीचे काम अर्धवट करून पुर्ण कामाची MB तयार करून व खोटया दाखविलेल्या कामाचे बिले तयार करून सदर पुर्ण रकमेचा निधी बँक खात्यातुन काढून अपहार केलेला आहे.
दलितांच्या स्मशानभुमीचे वॉलकंपाऊड २०१५-१६ मध्ये मंजुर होते तारकंपाऊड बाबत ग्रामपंचायत कार्यालयात बऱ्याच वेळेस वाद उद्भवल्याने सदर कंपाऊंडचे काम आजपर्यंन्त रद्द ठेवण्यात आले होते. सदर १४ वा वित्त आयोगाचा निधी खर्च करावयाची मुदत ३१/०३/२०२१ पर्यन्तची असतांना देखील सदरचे काम दिनांक १०/०४/२०२१ ला सुरू करण्यात आले. सदर काम दलितांच्या स्मशानभुमी साठी मंजुर असल्याने त्याच जागी होणे अपेक्षित होते. तरी देखील सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी संगनमताने या निधीचा अपहार कलेला आहे.
सदर तक्रारीची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबधीतांकडून रक्कम वसुली करण्यात येऊन व सदर निधीचा अपहार केल्या प्रकरणी सरपंच यांचेवर अपात्रतेची तर ग्रामविकास अधिकारी यांचेवर निलंबणाची कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी तक्रारदार महेंद्र सोनवणे यांनी म जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव तसेच विभागीय आयुक्त नाशीक यांचेकडे केली आहे