प्रवीण मेघे
यावल (प्रतिनिधि) रणतळे वनारवाडी ता.दिंडोरी या ठिकाणी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली तर जिल्हा पोलीस उपअधीक्षक मा.अनंतराव पठाडे यांचे उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.डोगर कठोरा येथिल केंद्रीय कोअर कमिटीचे राष्ट्रीय महासचिव मुकेश मधुकर सोनवणे यांच्या कार्याबद्दल क़वतुक करून त्याचे स्वागत करून समाजात केले या वेळी विचारपिठावर व्याख्यात्या म्हणून सर्वश्री सौ.मिनाक्षीताई जगदाळे , वसंतराव वाघ, अन्नासाहेब पंडीत, वैशालीताई जाधव, रफीक सैयद, अशोकभाऊ गांगुर्डे, वैशालीताई चव्हाण, टीकुभाई कोहली, मुकेश सोनवणे, मनिषाताई पवार, राधाताई क्षिरसागर, मायाताई आहीरे, वर्षाताई आहीरे, आदी.मान्यवर उपस्थित होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस मान्यवरांचे हष्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुत्रासंचालन प्रदीपनाना गांगुर्डे यांनी केले. या प्रसंगी रफीक सैयद व विशाल पांडव यांनी अंधश्रद्धा बुवाबाजी भांडाफोड या वर लघुनाटीका सादर केली तर कवी राजु लहीरे सर व परवीन बागवान यांनी गितगायन केले. राधा क्षिरसागर व सुनिता वाघ यांनी राजमाता जिजाऊ भोसले यांची वेषभुषा तर रफीक सैयद यांनी तानाजी मालुसरे यांचे पात्र घेवून कला सादर केली. या प्रसंगी शशीभाऊ जाधव , राजाभाऊ सोनवणे, रेखाताई जाधव, प्रवीण पांडव, प्रवीण जाधव, प्रकाश कुमावत, ममता पुणेकर, शारदाताई जाधव, सुवर्णाताई गांगुर्डे, भिमराव जाधव, चंद्रकला जाधव, निर्मला गायकवाड, शोभा वाहुळे, रविराज सोनवणे, सचिन बागुल, विकी पगारे, संदीप साबळे, सुनिता ताई जाधव, मंगल पगारे, बेबी आहीरे, कोमल जाधव, ताईबाई पवार, संदीप ढेंगळे, सुदेश गांगुर्डे, एँड.शेखर पगारे, बाळासाहेब क्षिरसागर, मिलिंद जाधव, राजेंद्र जाधव, पल्लवी पगारे, संगीता जाधव, आदींसह अनेक मान्यवर व पदाधीकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपानंतर वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी संदीप साबळे यांनी आभार मानले.