रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा एक-दोन दिवसांत रशियन सैन्य कीव्ह ताब्यात घेईल, असे सर्वजण गृहीत धरून होते. मात्र, युक्रेनच्या सैन्याने गेल्या 72 तासांपासून रशियाच्या सैन्याला कीव्हबाहेर रोखून धरले आहे. चौफेर हल्ले आणि जोरदार बॉम्बस्फोटानंतरही युक्रेन गुडघे टेकायला तयार नाही. परिणामी रशिया बिनशर्त चर्चेसाठी तयार झाली असून, रशियाने चर्चेसाठी बेलारूसला शिष्टमंडळ पाठवले आहे. पण, युक्रेनने चर्चेसाठी अट घातली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेनेस्की यांनी म्हटले आहे की, 72 तासांपासून कीव्हमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रशियाने युक्रेनच्या धाडसापुढे यावेळी बिनशर्त चर्चेची तयारी केली आहे. याआधीही रशियाकडून चर्चेचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यानंतर पुतिन यांनी अशी अट घातली की, जर युक्रेनियन सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली तर ते चर्चेसाठी तयार आहेत. तेव्हाही आम्ही शरणागती पत्करण्यास नकार दिला होता.
आता रशियाने चर्चेसाठी बेलारुसला शिष्टमंडळ पाठवले आहे. बेलारूसमधील चर्चा आम्ही नाकारली आहे. कारण बेलारूस लॉन्चपॅड म्हणून वापरला जातो. त्यामुळे तिथे चर्चा होणार नाही. रशियाला जर खरंच चर्चा करायची असेल, तर पोलंड, तुर्कस्तान, हंगेरी, अझरबैजान, स्लोव्हाकिया या देशांमध्ये आपले शिष्टमंडळ पाठवावे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.