उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत दोन राष्ट्रीय पक्षांचा फ्लॉप शो,,,

0
9

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष हे दोन राष्ट्रीय पक्ष आतापर्यंत दोन अंकी आकडा पार करू शकलेले नाहीत.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बसपा ५ आणि काँग्रेस केवळ ६ जागांवर पुढे आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप २४३, समाजवादी पक्ष ११८, काँग्रेस ६ आणि बसपा केवळ पाच जागेवर पुढे आहेत.

काँग्रेस आणि बसपा हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. काँग्रेसने यावेळी यूपीमध्ये प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती आणि मायावतींच्या नेतृत्वाखाली बसपा रिंगणात होती.

मायावती २००७ साली मुख्यमंत्री झाल्या मात्र, २०१२ मध्ये त्यांच्या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बसपा पुन्हा सत्तेत आलेला नाही.

काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर जवळपास तीन दशकांनंतर सर्व ४०३ जागा युती न करता लढत असली तरी ट्रेंडमध्येही पक्षाची अवस्था वाईट असल्याचे दिसून येत आहे.

Spread the love