यावल (प्रतिनिधी ) चला संविधान रक्षक दल कडे, हा उपक्रम राबवत बी.एस.पी चे संस्थापक, डॉ.बाबा साहेब आंबेडकरांची चळवळ घरो घरी पोहचवणारे मान्यवर कांशीराम यांच्या जयंती निमित्त काल दिनांक १५ मार्च रोजी संविधान संविधान रक्षक दल भीम आर्मी ची यावल तालुका युनिट ची बांधणी व मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला.
संविधान रक्षक दल महाराष्ट्र प्रमुख रमाकांत तायडे, राज्य सचिव सुपडू संदानशिव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला,जळगांव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे, उपाध्यक्ष विक्रम प्रधान यांच्या सुचणे नुसार तर जिल्हा सचिव राजु इंगळे, मुख्य संघटक डॉली वानखेडे यांच्या साथीने महापुरुषांच्या प्रतिमेश पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्याच बरोबर या कार्यक्रमात डॉ. योगेश भालेराव यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, तर यावल तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे घोषित करण्यात आलेली आहे,१)सचिन वानखेडे यावल तालुका अध्यक्ष,२)मिलिंद जंजाळे यावल तालुका उपाध्यक्ष,३)शिवाजी गजरे यावल तालुका सचिव,४) गौरव सोनवणे यावल तालुका महासचिव,५)विनोद भालेराव यावल तालुका कार्याध्यक्ष,६) सतीश अडकमोल यावल तालुका मुख्य संघटक,७)राजू वानखेडे यावल तालुका संघटक,८)विनोद सोनवणे यावल तालुका सचिव,९)धनराज तायडे यावल तालुका सहसचिव,१०)करण ठाकरे यावल तालुका प्रचार प्रसिद्धी प्रमुख, सदर कार्यक्रम प्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्तित होते, तर संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जंजाळे यांनी केले आहे.