दुधाचा गोरखधंदा करणाऱ्यांवर कारवाई बिडगाव येथे पोलीसांचा छापा ४ जणांना अटक, मुख्य सुत्रधार फरार. ११ लाखाचा मुद्देमाल जप्त.

0
43

प्रतिनिधी – महेश गायकवाड

चोपडा –  तालुक्यातील बिडगाव शिवारात असलेल्या कुंड्यापाणी येथे भेसळयुक्त दुधाचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीवर छापा टाकुन पोलीसांनी ४ संशयीतांसह तब्बल ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून यातील एक आरोपी फरार झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव, पोलिस महानिरिक्षकांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरिक्षक व पथक, अडावद पोलीस अशा संयुक्त पथकाने ही विशेष कारवाई केली.

बिडगाव शिवारातील कुंड्यापाणी येथे संभाजी मोतीराम पाटील यांच्या मालकीच्या शेतात लक्ष्मण देवा भरवाड रा. पळासनेर हा हस्तकामार्फत खाद्य तेल (पाम तेल), दुध पावडर चे मिश्रण करुन दुधात भेसळ करत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे  काल दि. २४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलीसांच्या विशेष पथकाने छापा टाकला असता.भेसळयुक्त दुध, तसेच खाद्यतेल, दुध पावडर, मिक्सर, दुधाचे कँन, बादल्या, दुधाची वाहतुकीसाठी असलेल्या २ गाड्या, मोबाईल असा तब्बल ११ लाख १८ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.भिकन अशोक साळुंके(२५, चिंचोली), हेमंत रतीलाल महाजन (४२, धानोरा), सारा बुटा भरवाड(४०, लिंबडी गुजरात), हर्षल पंढरीनाथ पाटील (१८, चिंचोली) यांना अटक करण्यात आली असुन लक्ष्मण देवा भरवाड रा. पळासनेर शिरपुर हा फरार आहे. यांच्या विरुध्द अडावद पोलीसठाण्यात भादवी २७२, २७३, ३२८, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love