चोपडा प्रतिनिधी (महेश गायकवाड)
अडावद -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या वतीने गुढीपाडवा उत्सवानिमित्त शनिवार रोजी गावातून पथसंचलन करण्यात आले.याप्रसंगी ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली व फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत हि करण्यात आले.
सार्वजनिक विद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी तालुका संघ चालक मनोज साळुंके
यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.संघाला सत्ता नाही पण समाज घडविण्याचे काम करणे असल्याचे सांगितले.याप्रसंगी संघाचे विभाग कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे, विश्व हिंदु परिषद चे विभाग मंत्री शांताराम शिंदे, शांताराम पाटील, हनुमंत महाजन,उपस्थित होते.सार्वजनिक विद्यालयापासून स्वयंसेवक संघाचे पथसंचलनास सुरूवात झाली.ग्रामपंचायत मार्गे सुभाष चौक, गोळलीविहीर, जागेश्वर पतपेढी, नेहरू चौक, शंभुभवानी चौक, ग्रामपंचायत मार्गे सार्वजनिक विद्यालय प्रांगणात पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी नरेंद्र पाटील, राकेश पाटील, प्रेमराज पवार, कुणाल चव्हाण,सूर्यकांत महाजन,डॉ. विकास चौधरी,यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते यावेळी अडावद सपोनि किरण दांडगे, कादिर शेख,जगदिश कोळंबे, योगेश गोसावी, यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.